पश्चिम महाराष्ट्र

सर्वशक्तीपणाला लावून शेतकºयांना पुन्हा उभे करणार

(Last Updated On: October 22, 2020)

उस्मानाबाद : शेतकºयांनी खचून न जाता धीर धरावा. सरकार म्हणून आम्ही सर्वशक्तीपणाला लावून त्यांना मदत करून पुन्हा उभे करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
तुळजापूर तालुक्यातील कात्री या गावी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची व खरडून वाहून गेलेल्या जमिनीची २१ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनी पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या प्रांगणात लोकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, कात्रीचे सरपंच किशोर गोडगिरे, अपसिंगाचे सरपंच वैशाली गोरे, उपसरपंच दिपक सोनवणे आदी उपस्थित होते.
एकही नुकसानग्रस्त शेतकरी पीक नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही यादृष्टीने नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत तसेच शासन शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून निश्चितपणे त्यांना मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.