नागपूर

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या शिक्षेला स्थगिती

(Last Updated On: October 22, 2020)

नागपूर: वाहतूक पोलिसाला मारहाणप्रकरणी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना अमरावती सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज स्थगिती दिली. राज्य सरकारला नोटीस बजावत येत्या २७ तारखेपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
अमरावती सत्र न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्यासह तिघांना तीन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी १५ हजार ५०० रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध खंडपीठात करण्यात आलेल्या याचिकावर सुनवाणी झाली. सुनावणीदरम्यान शिक्षेचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत राज्य सरकारला शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला.
मंत्री यशोमती ठाकूर यांच्याच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी तसेच अ‍ॅड. कुलदीप महल्ले यांनी बाजू मांडली. राज्य सरकारकडून अतिरिक्त सरकारी वकील जोशी यांनी नोटीस स्वीकारली.