विदर्भ

वनौषधी उत्पादनवाढीसंबंधी बच्चू कडू यांचे विशेष निर्देश

(Last Updated On: October 22, 2020)

अमरावती : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल अशा अतिशय महत्त्वाच्या वनौषधींच्या उत्पादन उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पीक विम्याचे संरक्षण, विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, यवतमाळचे नवनाथ कोळमकर, वाशिमचे शंकर तोटावार, अकोलाचे यू. एस. नलावडे, बुलडाणाचे नरेंद्र नाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत उपस्थित होते.
समितीतील तज्ज्ञगटांनी केलेल्या शिफारशी राज्यस्तरावर सादर करून वनौषधी उत्पादकांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. विविध शारीरिक व्याधींवर गुणकारी असलेल्या या उत्पादनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये उत्पादन, विपणन आणि बाजारपेठेची स्थिती याबाबतचा समिती अभ्यास करणार आहे. समितीमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा येथील कृषी संशोधक, तज्ज्ञांचा समावेश असेल. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. वनौषधींची शेकडो वर्षांपासूनची उत्पादन परंपरा पाहता वनौषधींना भौगोलिक चिन्हांकनाबाबतचा अभ्यासही समिती करणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
विषमुक्त शेतीच्या समस्यांवर उपाययोजना
सेंद्रिय उत्पादन मिळेल, असा फलक लावून विषारी उत्पादने विकणाºया उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे आयोजित विषमुक्त शेतीविषयी आयोजित बैठकीत दिले.
सेंद्रिय उत्पादनाच्या नावाखाली फळ, भाजीपाला आणि इतर उत्पादनाची विक्री करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे प्रामाणिक सेंद्रिय शेती उत्पादकांचे नुकसान होत आहे. अशी विक्रे त्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.