Home प्रादेशिक मराठवाडा पंचनाम्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी

पंचनाम्यांबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नाराजी

106

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे योग्यरितीने होत नसल्याबद्दल विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचा दौरा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
विमा कंपन्यांनी विमा दावे स्वीकारावेत आणि मान्य करावेत, नुकसानीचा कुठल्याही सरकारी संस्थेनं केलेला पंचनामा मान्य करावा, बँकांनी कजार्बाबत शेतकºयांमागे तगादा लावू नये, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
केंद्र सरकारकडून मदत मिळत नसल्याचा कांगावा राज्य सरकार करत आहे. वस्तू आणि सेवाकरात सूट मिळवण्यापासून ते अन्य कुठलीही मदत मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागते़ मात्र, हे सरकार अशा प्रक्रिया पूर्ण करत नसल्याची टीका देखील फडणवीस यांनी केली.