राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

प्रवाशांनो, आता सामान सोडून स्टेशनवर या…

(Last Updated On: October 22, 2020)

नवी दिल्ली : उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाने रेल्वे प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅप आधारित ‘बॅग्स आॅन व्हील्स’ ( bags on wheels) सर्व्हिस सुरू केली आहे. या माध्यमातून प्रवाशांचे सामान घरापासून गाडीच्या थेट डब्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून, कंत्राटामार्फत सुरक्षितरित्या ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. ‘एनबीटी’ ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.
उत्तर व उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव चौधरी यांच्यानुसार, रेल्वे नवीन उपाययोजनांच्या माध्यमातून महसूल वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. या दिशेने कार्य करीत दिल्ली विभागाने अलीकडेच ही योजना मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू केली आहे. सदर अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयफोनवर उपलब्ध आहे. संबंधित प्रवासी सामानास आपल्या घरातून रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकातून घरी आणण्यासाठी अर्ज करतील. हे सामान सुरक्षितपणे नेण्याचे काम ठेकेदारामार्फत काम केले जाईल.