महिलांचा आदर सदोदित व्हावा

राष्ट्रीय

नवी दिल्ली : समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महिला सशक्तीकरण ही मोठी संधी असून महिलांचा आदर सदोदित करण्यात यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( modi on durga pooja) यांनी केले.
दुर्गापुजेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून त्यांनी आज पश्चिम बंगालच्या जनतेला संबोधित केले. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला पश्चिम बंगाल मधूनच बळकटी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी एका वक्तव्यात केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *