Home संपादकीय नॉट प्रेसिडन्ट ट्रम्प, तर संपूर्ण जग…

नॉट प्रेसिडन्ट ट्रम्प, तर संपूर्ण जग…

108

सध्या जागतिकस्तरावर दोन बाबी महत्त्वाच्या ठरल्या आहेत़ एक म्हणजे चीनने अख्ख्या मानवजातीला प्रदान केलेला कोरोना आणि दुसरी अर्थातच अमेरिकन राष्ट्रपतीपदाची निवडणूक.
यासाठी येत्या 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे आणि यावेळी निवडणूक (american president election)  प्रचार जोरात सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून विद्यमान राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि दुसºया बाजूला डेमोक्रॅटिकचे जो बिडेन आहेत. या देशात झालेल्या अनेक सर्वेक्षणांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, त्याचवेळी ब्लूमबर्गच्या एका अहवालात ट्रम्प समजा निवडणूक हरले तर तो एकट्याचा पराभव नसेल. जागतिकस्तरावरील अनेक नेत्यांना त्यांची झळ बसेल.
ब्लूमबर्ग न्यूजच्या अहवालात जो बिडेन यांच्या विधानाचा उल्लेख आहे, ज्यात त्यांनी अध्यक्षांनी (डोनाल्ड ट्रम्प) जगातील सर्व ठगांना मिठी मारली असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प अमेरिकन वर्चस्वाची रणनीती राखू शकले नाहीत. त्यांनी आपल्या चार वर्षांतील कार्यभार सांभाळताना अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्याची पारंपरिक रणनीती पूर्णपणे मोडली. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी तीन वेळा भेट घेतली. अनेक पत्रे लिहिलीत; पण अमेरिकेला यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. विशेष म्हणजे यापूर्वी किम जोंग उन विरोधातअमेरिकेने नेहमीच कठोर भूमिका घेतली होती.
चीनला सोडले
आपल्या विस्तारवादी तसेच साम्राज्यवादीच्या भूमिकेतून चेकाळलेल्या चीनला कायमचा धडा शिकवण्याची संधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हातोहात गमावली़ अनेक देशांशी सीमावाद, समुद्रातही लष्करी अतिक्रमण, सिंगापूर वाद, आपल्या देशातील मुस्लिमांविरोधात अन्यायाची भूमिका, गरीब देशांना आर्थिक कर्जे पुरवून गुलाम बनवण्याची महत्त्वाकांक्षा, अशा अनेक कृत्यांनी पकडीत आलेला चीन हा जगावर लादलेल्या कोरोना संसर्गामुळे पायाखाली आला होता; परंतु अमेरिकेने अन्य राष्ट्रांची मदत न घेता कोणताही हिताचा निर्णय घेतला नाही. शिवाय ट्रम्प यांनी चीनविरोधात कठोरपणा दाखवला असला तरी त्या देशाचा तोटा तसा कमीच केला, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्या पारंपरिक रणनीतीचा अवलंब करून चीनच्या हुकूमशाही वृत्तीविरुद्ध जागतिक राजकारणात अधिक हस्तक्षेप करता येणे शक्य होते. ट्रम्प यांना ते जमले नाही, असेही ब्लूमबर्गने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here