महिलासंबंधी ‘डार्क स्पॉट’ निश्चित करून सुरक्षा पुरवणार

राजधानी मुंबई

मुंबई : महिला, मुलींना असुरक्षित वाटणाºया जागा (डार्क स्पॉट) निश्चित करून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मोठ्या शहरांमध्ये पोलिस विभागाच्या माध्यमातून अशा ठिकाणी विद्युत दिवे, सीसीटीव्ही आदी उपाययोजना करण्यात येत आहेत, तर ग्रामीण भागात ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या माध्यमातून बालके तसेच महिलांच्या संरक्षण उपाययोजनांसाठी प्रयत्न होतील. केवळ महिलांसाठी समर्पित असा क्र. 181 टोलफ्री क्रमांक कार्यान्वित केला जाईल, अशी ग्वाही यशोमती ठाकूर यांनी दिली.
महिलांची सुरक्षा, संरक्षण या अनुषंगाने राज्यात महिला सुरक्षा आॅडिट करणे या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणाºया अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी, बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य श्रीमती नीला लिमये आदी उपस्थित होत्या.
महिलांवरील अत्याचार हा संपूर्ण देशातच गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांची संवेदनशीलता वाढवावी लागणार असून राज्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गृह, परिवहन, शिक्षण आदींसह सर्वच विभागांच्या समन्वयातून काम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र असा विचार पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही मंत्री ठाकूर म्हणाल्या.
आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्याच्या कायदा करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, असे सांगून गृह राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाल, की महिलांची सार्वजनिक सुरक्षा हा महत्त्वाचा विषय मानून सर्वच विभागांचे या कामाबाबतचे मूल्यांकन केले पाहिजे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने महिला शेतीक्षेत्रात काम करतात. त्यांच्या सुरक्षेबाबतही सर्व यंत्रणांनी संवेदनशील राहिले पाहिजे. राज्यात पोलीस विभागामार्फत ह्यडायल 112 हा टोलफ्री क्रमांक योजना कार्यान्वित करण्याचे काम सुरू असून केवळ 10 मिनिटात प्रतिसाद देण्याची यंत्रणा तयार केली जात आहे. केवळ याच टोलफ्री क्रमांकावर आलेल्या कॉलला प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसण्यासह संकटाच्या प्रसंगी जलद मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *