टपोरी टुरकी ....Jocks for You

कुठं चाललास गधड्या… Tapori Turaki

(Last Updated On: October 23, 2020)

मास्तर : सांग बरं झम्प्या, पुरुषांचे आयुष्य
सुखी असण्याची कारणं
झम्प्या : तशी बरीचं आहे सर, त्यापैकी काही सांगतो.
१. त्यांचे आडनाव आयुष्यभर एकच असते.
२. फोनवरचे बोलणे जवळपास ३० सेकंदात संपते.
३. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं,तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.
४. आयुष्यभरासाठी त्यांची एकच हेअर स्टाईल टिकून राहते.
५. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तरीही ते २५ मिनिटांत गुंडाळून टाकतात.
६. एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर दुसºयाचे कपडे पाहून मत्सर वाटत नाही़ उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून अधिक एन्जॉय करतात.
ँम्हणजेच सर, पुरुष हे आलूसारखे असतात, कोणत्याही भाजीबरोबर अ‍ॅॅडजेस्ट होतात.
***

पंक्या : आज्जी … नमस्कार करतो.
आजी : कुठं चाललास गधड्या…
पंक्या : पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद आहे मग…पण जरा सावकाश पळ रे बाबा!

*****