Home उपराजधानी नागपूर ‘माझ्या ताईला साडी’ उपक्रमात दानशूरांनी सहभागी व्हावे

‘माझ्या ताईला साडी’ उपक्रमात दानशूरांनी सहभागी व्हावे

84

नागपूर : दीपस्तंभ धर्मदायी संस्थाच्या वतीने नवरात्रात ‘माझ्या ताईला साडी’ हा उपक्रम राबवण्यात येत असून समाजातील संवेदनशील आणि दानशूर व्यक्तीनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या रविवारी विजयादशमीला त्याचा समारोप होत आहे.
समाजातील गरीब, विधवा, गरजवंत अशा ५१ ‘जित्या जागत्या देवीं’ना साडीचोळी, धान्य, सॅनिटाईझर, औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. साडीचोळी देऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलवावे हाच एकमेव प्रामाणिक उद्धेश असल्याचे अध्यक्ष राजेंद्र चौरागडे यांनी सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत आतापर्यंत ४१ गरजवंत महिलांना साडीचोळीची भेट देण्यात आली. सदर उपक्रमात सहभागी होणे असल्यास Deepstambha Dharmdayee Sanstha,account no.: 31746447983, IFSC code:SBIN0006273, Branch: Gopalnagar Nagpur या खात्यावर मदत करता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा मानकर, भारती चौरागडे, संगीता महाजन, लक्ष्मी विजयवार, संगीता पानसे, संस्थेचे सचिव नंदकिशोर मानकर मार्गदर्शक अजय उपलेंचीवर, शरद नार्लावार, विनोद महाजन, आनंद बोरकर, धीरज नारनवरे, कैलास येशने, प्रशांत कळसे, राजेंद्र केवटे आदी सहकार्य करत आहे.