राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

कपिल देव यांची प्रकृती ठीक

(Last Updated On: October 24, 2020)

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली आता प्रकृती ठीक असून रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली असल्याचे कपिल देव यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा कपिल देव यांच्या छातीत दुखणे सुरू झाले होते़ यानंतर त्यांना दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रात्री तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असून दोन दिवसांत सुटी मिळण्याची अपेक्षा आहे.