Home प्रादेशिक विदर्भ एकलव्य आश्रमशाळांसंबंधी प्रस्ताव सादर करावा

एकलव्य आश्रमशाळांसंबंधी प्रस्ताव सादर करावा

72

भंडारा : नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर एकलव्य आश्रमशाळा भंडारा जिल्ह्यात सुरू करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने शासनाला प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले. याठिकाणी आदिवासी समाजाची 90 हजारांच्या जवळपास लोकसंख्या असून एकलव्य आश्रमशाळा उघडण्यासाठी जिल्हा निकषात बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, जिल्हा पणन अधिकारी महेंद्र हेडाऊ, उपनिबंधक सहकारी संस्था मनोज देशकर, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी आदी उपस्थित होते.
मागील वर्षी मंजूर असलेल्या स्थानिक सर्व धान केंद्रावर धान खरेदी सुरू करावी. यासाठी शासनाचे निकष पूर्ण करणाºया संस्थांना केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. गाव तेथे धान खरेदी केंद्र उघडण्याची आवश्यकता पडल्यास मंजुरी द्यावी, असे निर्देश नाना पटोले यांनी दिले.
यात शेतकºयांची लूट होता कामा नये. खरेदी केंद्रावर अशाप्रकारच्या तक्रारी दरवर्षी प्राप्त होत आहेत. धान खरेदी केंद्र विभाजनाची कार्यवाही 15 दिवसांत पूर्ण करावी. शेतकºयांची गैरसोय होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here