घरी राहूनच दसरा साजरा करा : वनमंत्री संजय राठोड

यवतमाळ

यवतमाळ : दरवर्षी आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे दसरा सण उत्साहाने साजरा करतो. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशावर संकट आले आहे. त्यावर विजय मिळवायचा असेल तर सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदा दसरा सण घराच्या बाहेर न पडता कुटुंबासोबतच साजरा करावा, असे कळकळीचे आवाहन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मागील अनेक शतकांपासून आपण दसरा हा सण उत्साहाने साजरा करतो. मात्र, यावर्षी हा सण आपल्याला कुटुंबसोबत राहून घरातच साजरा करायचा आहे. सध्या महाभयानक अशा कोरोनाची साथ सुरू आहे. या महामारीमुळे अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. कित्येक कुटुंबाचा आधार गेला. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी या महामारीविरुद्ध दिवसरात्र लढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशाप्रमाणे काही अटी घालून दिल्या आहे. त्या अटींचे पालन करून आपण कोरोनाच्या संघर्षात विजयी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे व मास्क वापरणे हेच महत्त्वाचे आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी दसरा सण कुटुंबासोबत घरात राहूनच साजरा करा, आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *