देश

मर्यादेतच राहावे लागणार आहे : पंतप्रधान

(Last Updated On: October 25, 2020)

नवी दिल्ली : कोरोना संकटकाळात आम्हा सर्वांना संयमानेच वागावे लागणार आहे, मर्यादेतच राहावे लागणार आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.
पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ द्वारे संवाद साधत असतात. आज 25 आॅक्टोबर रोजी देखील त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
पुढील काही दिवसांत अनेक उत्सव येणार आहेत. ईद, कोजागिरी पौर्णिमा, वाल्मिकी जयंती असून धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छट पूजा, गुरू नानक देवजी जयंती आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.