Home रानशिवार वेळेचा सर्वोत्तम उपयोग… SAAY pasaaydan

वेळेचा सर्वोत्तम उपयोग… SAAY pasaaydan

97

 संत राजिन्दर सिंहजी महाराज

वेळ मौल्यवान आहे. एकदा वेळ निघून गेली की तिला परत आणता येत नाही. आपण प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या वस्तूकरिता वेळ खर्च करीत असतो. आपण आपला वेळ क्रोध, मोहाच्या विचारात खर्च करतो का? आपण भूतकाळाच्या चिंतनात अथवा भविष्याचा विचार करण्यात घालवणार का? आपण अशा काही मनोरंजनासाठी वेळ खर्च केला का ज्याची आपल्याला काहीही किंमत नाही किंवा आपण ते क्षण अशा काही घडामोडी खर्च करण्यात घालवणार का ज्या मुळे आपण स्वत:ला ओळखू शकू की आपण कोण आहोत आणि आपण येथे कशासाठी आलो आहोत. आपल्या जीवनात आपणासाठी सर्वात जास्त मौल्यवान काय आहे.
जर आपण महान व्यक्तींच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येईल की अनेक व्यक्तींनी आपल्या जीवनात एक दिशा निश्चित केलेली होती. त्यांनी आपली कला, आपले शास्त्र, आपले छंद, शोध आणि आपला आध्यात्मिक विकास यावर लक्ष केंद्रित केले होते. या सर्वांमध्ये एकच गोष्ट आढळून येते की ते निश्चित लक्ष्यापासून दूर जात नव्हते. त्यांनी आपला मार्ग निर्धारित केला होता आणि ते त्याला अनुसरत होते.
शिखांचे नववे गुरु, गुरू तेगबहादूर महाराज यांनी प्रभू प्राप्त होईपर्यंत स्वत:ला एका लहान खोलीत कित्येक वर्ष ध्यान-अभ्यास करण्याकरिता बंदिस्त केले होते. भगवान गौतम बुद्धांनी आपला राजपाट सोडून ते सत्याच्या शोधात निघून गेले. त्यांनी संसाराची अवस्था आणि आपण कोण आहोत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अनेक वर्ष खर्च केलीत. मोहम्मद पैगंबर यांनी अल्लाला शोधण्यासाठी अनेक वर्षे गुहेत तपश्चर्या करण्यात घालविली.
प्रश्न असा आहे कि आपण या भवसागरात मध्ये ध्येया शिवाय भरकटून जात आहोत का? आपण आपल्या जीवनाचा काही वेळ विचार करण्यात खर्च करतो का? आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहोत? माझे आध्यात्मिक गुरू परम संत कृपाल सिंह महाराज यांनी आपल्या लहान वयात विचार केला की जीवनात आपल्याला काय करावयाचे आहे. खूप आत्मचिंतन केल्यावर त्यांनी शेवटी निर्णय घेतला ‘प्रथम प्रभू, नंतर जग’. त्यांनी निश्चय केला की स्वत:ला ओळखणे आणि प्रभू प्राप्ती करणे हे प्रथम ध्येय राहील. हे ध्येय निश्चित मनात ठेवून आपला मार्ग अनुसरत राहिलेत आणि ते तोपर्यंत थांबले नाहीत, जोपर्यत ध्येयापर्यंत पोहोचले नाहीत.
जर आपण आत्म्याच्या शोधात असू तर त्यासाठी वेळ काढणे आहे. आपल्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी, त्याची निगा राखण्यासाठी आपण आपल्या जीवनाचा वेळ खर्च करीत असतो. विविध प्रकारची कामे जसे खाणे-पिणे, झोपणे, तयार होणे, अत्यावश्यक जीवनासाठी व्यवसाय अथवा नोकरी करणे यासाठी वेळेचा मोठा भाग आपण खर्च करीत असतो. फक्त थोडाच वेळ शिल्लक राहतो. त्याबद्दल आपण त्याचा विचार केला पाहिजे. वेळेचा सर्वोत्तम उपयोग करून आपल्या मनुष्य जन्मात मिळालेल्या वेळेचे बहुमूल्य बक्षीस आपण नष्ट करता कामा नये.
आपण निरीक्षण केले पाहिजे की दिवसाच्या चोवीस तासात वेगवेगळ्या कामात आपण किती वेळ खर्च करतो. तेव्हा आपण हा निर्णय घेऊ शकतो की आपल्या अंत:करणात असलेल्या आत्म्याला जाणण्यासाठी आपण वेळ कसा काढावा. आपल्या आत्म्याची ज्योती आणि त्याचा खजिना प्रकट करण्यासाठी आपण प्रत्येक दिवशी ध्यान-अभ्यास करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जितका जास्तीत जास्त वेळ त्याला शोधण्यासाठी लावू तेवढे चांगले होईल. आपण रोज आपल्या आंतरिक शांतीसाठी आणि आंतरिक खजिन्याचा फायदा घेण्यासाठी आपल्या जीवनाचा सर्वोत्तम उपयोग केला पाहिजे.
चला, तर आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करूया. जर आपण असे केले तर आपण खूप मोठा अध्यात्मिक खजिना एकत्र करू शकू इतका,की आपण स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नसेल.

*****