Home राजधानी मुंबई मोठी बातमी : कोरोना चाचणीचे मूल्य 4500 रुपयांवरून ९८० रुपयांवर

मोठी बातमी : कोरोना चाचणीचे मूल्य 4500 रुपयांवरून ९८० रुपयांवर

55

मुंबई : राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाºया कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून प्रतितपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1,400 आणि 1,800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाही. 4,500 रुपयांवरून 980 रुपयांपर्यंत इतके कमी दर निश्चित करून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( rajesh tope) यांनी सांगितले.

कोरोना चाचण्यांचे दर निश्चित करताना तीन टप्पे करण्यात आले असून प्रयोगशाळेत तपासणी केल्यावर 980 रुपये दर आकारण्यात येईल. कोविड सेंटर, रुग्णालये, क्वारंटाईन सेंटरमधील (quarntine center) प्रयोगशाळा येथून सॅम्पल गोळा करुन तपासणी करण्यासाठी 1,400 रुपये तर रुग्णाच्या घरी जाऊन सॅम्पल घेऊन तपासणी करण्यासाठी 1,800 रुपये असा कमाल दर आता निश्चित करण्यात आला आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने सातत्याने दरामध्ये घट करून रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांवर भर देण्यात येणार असून प्रतिदहा लाख लोकसंख्येमागे 70 हजार चाचण्या केल्या जात असून त्यात वाढवण्याचे निश्चित केले आहे. राज्यभरात सुधारित दरानुसार रुग्णांकडून पैसे आकारले जावेत यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here