मुंबई

महाराष्ट्र-अफगाणिस्तानातील सांस्कृतिक संबंधावर अधिक भर

(Last Updated On: October 27, 2020)

मुंबई : भारतीय सिनेमा आणि कलाकार अफगाणिस्तानमध्ये लोकप्रिय आहे. हीच लोकप्रियता पुढील काळातही अबाधित ठेवत महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केले जातील, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूत (कॉन्सुल जनरल) झाकिया वारदाक ( zakiya wardak ) यांच्यासह शफीऊल्ला इब्राहीमी, रफीऊल्ला केलेवल, आसिफ नवरोझे, अहमाद वारीस यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भविष्यात महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानात वैद्यकीय, सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून यादृष्टीने आराखडा तयार केला जाईल, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. अफगाणिस्तान हा ऐतिहासिक देश असल्याने तेथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. प्रख्यात बौद्ध बामीयान लेणी, काबूल कंदहार ही शहरे, अनेक वास्तू, इदगाह मशीद, बाबर गार्डन तसेच अनेक निसर्गरम्य डोंगर, दºया आणि धबधबे आदी चित्रीकरणासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे याठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी काय करता येईल याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आणि अफगाणिस्तानी शिष्टमंडळामध्ये प्राथमिक बोलणी झाली. अफगणिस्तानच्या वाणिज्यदूत झाकिया वारदाक यांनी महाराष्ट्र आणि अफगाणिस्तानात सांस्कृतिक देवाण घेवाण वाढावी, वेगवेगळे सांस्कृतिक महोत्सव आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.