राज-सत्ता

पाकिस्तानात शाळेत बॉम्बस्फोट, सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

(Last Updated On: October 27, 2020)

पेशावर : पाकिस्तानातील वायव्य भागात मंगलाव्हरमधील एका धार्मिक शाळेत झालेल्या बॉम्बस्फोटात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले असल्याचे प्राथमिक माहिती आहे. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी वकीर अजिम यांनी सांगितले, की पश्चिम इस्लामाबादपासून १७० किलोमीटर अंतरावर पेशावरमधील एका मदरशामध्ये वर्गात करण्यात आला. एक अनोळखी व्यक्ती बॅग घेऊन मदरशाच्या आत आला. स्फोट होण्यापूर्वीच तो बाहेर पडला होता. अन्य एक वरिष्ठ पोलिस अधिकारी मोहम्मद अली गंडापूर यांच्यानुसार हल्ल्यात किमान सात लोक ठार आणि 50 हून अधिक लोक जखमी झाले.
स्थानिक रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असिम खान यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली. सात मृतदेह आणि 70 जखमींना रुग्णालयात आणले असून मृतक वा जखमी झालेल्यांपैकी बहुतेकांना बॉल बेअरिंगमुळे दुखापत झाली आहे. काहींना जळाल्याच्या जखमा आहेत. मृत विद्यार्थ्यांचे वय 20 ते 40 वर्षांच्या दरम्यान आहे. जखमींमध्ये शिक्षक आणि 7 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.