Home राष्ट्रीय बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी

बिहारमध्ये मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी

74

पाटणा : बिहार विधानसभेच्या 233 जागांवर होणाºया निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी गुरुवारी (28 आॅक्टोबर) मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील प्रचार काल सोमवारी सायंकाळी संपुष्टात आला. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जनता दल युनायटेड (जेडीयू) या पक्षाने भारतीय जनता पार्टी (भाजप) सोबतच्या युतीद्वारे जोरदार प्रयत्न चालवले आहे. मागील निवडणुकीत जेडीयूने राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), कॉंग्रेस आणि डावे पक्ष (भाकप, सीपीएम आणि भाकप-एमएल) या महाआघाडीसोबत निवडणूक लढवली होती.
कोरोनासारख्या धोकादायक साथीच्या आजारातही राजकारणाने मोठी उफाळी मारली असून कोराना संक्रमणाची भीती ना उमेदवारांमध्ये ना मितदारांमध्ये दिसून येते. सार्वजनिक आरोग्य सुरक्षतेच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक चित्र राज्यात असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.