Home राजधानी मुंबई खासगी मेडिकल कॉलेजेसनी शैक्षणिक शुल्कवाढ करू नये

खासगी मेडिकल कॉलेजेसनी शैक्षणिक शुल्कवाढ करू नये

65

मुंबई : कोविड-१९ या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाºया शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करू नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले.
आज खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाºयांसमवेत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फीवाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here