नागपूर

हुक्कापार्लरवर सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई

(Last Updated On: October 27, 2020)

नागपूर : सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने धरमपेठेत रूफ 9 अशा नावाने प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याच्या गुप्त माहितीवरून धाड टाकण्यात आली. यावेळी घटनास्थळावरून ग्राहक आणि हुक्कापार्लर चालक पळून गेले. पोलिसांनी हुक्का पॉट, विविध फ्लेवरचे तंबाखू हुक्का, प्लेअर स्पीकर, म्युझिक सिस्टिम, मोबाईल फोन, टेबल व खुर्ची असा एकूण एक लाख 33 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हुक्कापार्लरवर (nagpur hukka) बंदी असतानाही खाद्यगृहाच्या जागेत हुक्का पुरवून सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपी समीर शर्मा आणि लकी जैयस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गजानन राजमाने, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनातील कारवाईत पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक अतुल इंगोले, मपोउपनि स्मिता सोनवणे, मपोउपनि लक्ष्मीछाया तांबुसकर, पोहवा अनिल अंबाडे, नापोशि चेतन गेडाम, संदीप चंगोले, पोशि भूषण झाडे, मनीष रामटेके, अजय पौनिकर, पोशि सुधीर तिवारी, मनापोशि रिना जाऊरकर, मपोशि सुजाता पाटील, कुमुदिनी मेश्राम यांनी सहभाग घेतला.