अकोला : राज्यातील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या या ‘रिसोर्स बँके’ची माहिती घेऊन शेतीक्षेत्रातील संशोधनाला अधिक बळ देता येईल, असा विश्वास निर्देश कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा प्रतिकुलपती (कृषी विद्यापीठ ) दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. ‘संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समिती-२०२०’ ची ४८ व्या सभेत ते बोलत होते.
बदलत्या हवामानामुळे शेतपिकांवर होणारे परिणाम ही कृषि संशोधकांसमोरील आव्हानात्मक बाब आहे. या पार्श्वभूमीवर विचारविनिमय घडवून आणून संशोधनाची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे हे सशक्त व्यासपीठ आहे. कापूस आणि सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांसाठी गुणवत्ता आणि संख्यात्मकदृष्ट्या अधिक सखोल संशोधन होण्याची गरज आहे. कृषि संशोधन शेतकºयांपर्यंत पोहोचवण्याची गरज असून कृषि विद्यापीठांकडील मोकळ्या जमिनीवर रोपवाटिका, बियाण्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला जावा, असेही ते म्हणाले.
बीज उत्पादनापासून बाजारापर्यंतचा संशोधन आराखडा सादर करावा : मुख्यमंत्री
आतापर्यंत झालेल्या कृषि संशोधनाचे नेमके काय झाले़ बांधापर्यंत किती संशोधन पोहोचले याचा आढावा घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना अधिक यशस्वी करण्यासाठी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत पुन्हा एकदा बैठक घेणार असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले.