Home विदर्भ यवतमाळ सोयाबिनच्या शेंगांमध्ये कोंब, दाण्याला येतेय दुर्गंधी

सोयाबिनच्या शेंगांमध्ये कोंब, दाण्याला येतेय दुर्गंधी

85

बाभुळगांव (यवतमाळ) : पोळ्यानंतर सतत महिनाभर आलेल्या दमदार पावसाने सोयाबिनच्या शेंगांमध्ये कोंब फुटले. आता काहीशा वाळलेल्या दाण्यांना दुर्गंधी येत असल्याने त्याला बाजाारात भाव किती मिळणार, अशी मोठी चिंता बाभुळगांव तालुक्यातील तरोडा येथील शेतकरी सतीश सरोदे यांच्या समोर उभी ठाकली आहे.

मागील काही दशकांपासून सोयाबिनच्या पेºयात अनेक पटींनी वाढ झाली आहे़ लवकर येणारे पीक म्हणून त्याला पसंती देण्यात येत असली तरी हमखास असा भाव नशिबी मात्र नसतोच. खरे तर हे बेवड पीक असून ते एक वर्षाआड घेणे अपेक्षित असते; परंतु शेतकºयांकडून ते दरवर्षी पेरल्या जाते़ युवा शेतकरी सतीश सरोदे हे सुद्धा त्याला अपवाद नाही़ लवकर पीक उत्पादन हाती येत असल्याने पैसाही तत्काळ मिळतो, हा त्यांचा इतरांप्रमाणेही समज झाला. त्यामुळे ते सुद्धा अन्य पिकांच्या जोडीला सोयाबिन पीक घेत आहेत.

मागील वर्षी त्यांनी आपल्या चार एकरांच्या शेतजमिनीत चार पिशव्या बियाण्यांची पेरणी केली आणि 32 पोत्यांचे उत्पादन घेतले. यंदा मात्र गणित चुकले. त्याच जमिनीत त्यांनी सोयाबिनची पेरणी केली़ मात्र पोळा सण संपताच पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि यात त्यांचे मोठे नुकसान झाले़ यावेळी शेंगा पूर्णपणे भरल्या असतानाच पावसाच्या दणक्याने शेंगात कोंब रुजले़ पीक काढणीनंतर दाणे बारीक असल्याचे दिसून आले़ भरीसभर काहीशा वाळलेल्या या तीन-साडेतीन क्विंटलच्या दाण्यांना दुर्गंधी येत आहे़ त्यामुळे बाजार समितीत त्याला किती भाव मिळेल, याबद्दल त्यांना शंका निर्माण झाली आहे.

सतीश सरोदे

यंदाच्या उत्पादनाबाबत सतीश यांनी ‘अभिवृत्त’ ला सांगितले, की शेंगा भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात साधारण: एक महिना पाऊस आल्याने दाण्यात कोंब तयार झाले़ त्याचवेळी नुकसानीचा अंदाज आला होता़ यंदा या पिकासाठी एकूण 45 हजार इतका खर्च आला आहे. सध्या बाजारात चार हजार रुपयांचा (मागील वर्षांत हाच दर 3200 रुपये ते 3300 रुपये इतका होता.) भाव असून माझ्या पिकाला अर्धाच भाव मिळू शकतो़ त्यामुळे केलेला खर्च भरून निघण्याची शाश्वती अजिबात नाही. पीक वीमा असला तरी त्याची रक्कम किती येईल, हेही सध्या सांगता येणार नाही. त्यामुळे शासनाकडून आपल्या नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा सरोदे यांनी व्यक्त केली