Home राष्ट्रीय बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज

60

पाटणा : बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागांवर होणाºया निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांसाठी आज मतदान होत आहे. कोरोना विषाणू संसर्ग काळातील देशातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण 16 जिल्ह्यांतील 71 जागांवर मतदान होत असून  मंत्र्यांसह 1,066 उमेदवार रिंगणात आहेत. आज मतदान होत असलेल्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक ४२ ठिकाणी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) रिंगणात आहे. त्याखालोखाल ३५ ठिकाणी संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू, २९ ठिकाणी भारतीय जनता पक्ष तर २० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. कोरोनासारख्या धोकादायक साथीच्या आजारामुळे मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त असून सर्व त्यासंबंधीच्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी जेडीयू पक्ष, भारतीय जनता पार्टी यांची महायुती आणि महाआघाडी यांच्यात जोरदार टक्कर असल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत मात्र समीकरणे वेगळी होती. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील जेडीयूने राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे पक्ष (भाकप, सीपीएम आणि भाकप-एमएल) या महाआघाडीसोबत निवडणूक लढवली होती.
दरम्यान, दुसºया आणि तिसºया टप्प्यातील मतदान अनुक्रमे 3 नोव्हेंबर (94 जागा) आणि 7 नोव्हेंबर 2020 (78 जागा) रोजी होईल. तर मतमोजणी 10 नोव्हेंबरला पार पडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here