Home राष्ट्रीय भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचे निधन

74

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचे निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार, केशुभाई यांना शुक्रवारी श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाले.
केशुभाई यांनी दोन वेळा गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. केशुभाई पटेल यांनी 1995 मध्ये प्रथम मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी 1998 ते 2001 या काळात दुसºयांदा मुख्यमंत्रिपद भूषवले. त्यांनी राज्यात सहा वेळा विधानसभा निवडणुका जिंकल्या. केशुभाई पटेल यांनी 2012 साली भाजप सोडून आपला ‘गुजरात परिवर्तन पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here