Home राजधानी मुंबई लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

86

मुंबई : नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी सणाच्या काळात गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. ती बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे.
राज्यात कोरोना संकट पाहता ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक निर्बंध मागील काही महिन्यांत शिथील करण्यात आले आहेत. विविध सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. या सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया वेगाने सुरू असताना दुसरीकडे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कंटेन्मेंट झोनमध्ये कठोरपणे टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनचे पालन करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. देशात आधीच ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉकच्या सहाव्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्या निर्णयाला अनुसरूनच राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे.
राज्यात जून महिन्यापासून ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल्स, फूडकोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.