मुंबई

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना राबवणार

(Last Updated On: October 30, 2020)

मुंबई: राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संरक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. तसेच, ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे. मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून त्याला ‘बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’असे नाव देण्यात आले आहे.
———–