Home मुंबई दिवाळीतील हंगामी तिकीट दरवाढ रद्द

दिवाळीतील हंगामी तिकीट दरवाढ रद्द

43

मुंबई : यंदा एसटी दिवाळीतील हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री तसेच राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे ( ST MAHAMANDAL ) अध्यक्ष अनिल परब यांनी याबाबत घोषणा केली.
राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मान्यतेनुसार गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रो म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत. त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त केला जातो. यंदा मात्र कोविड-19 च्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक ओझे पडू नये म्हणून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दिवाळी काळातील तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here