Home राष्ट्रीय तुर्की, ग्रीस देशात विकाशकारी भूकंप

तुर्की, ग्रीस देशात विकाशकारी भूकंप

81

नवी दिल्ली : तुर्की आणि ग्रीस या दोन्ही देशांच्या सीमाभागात ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला असून यात आतापर्यंत १२ अधिक मृत्युमुखी पडले़ तर २०० पेक्षा जास्त जखमी असल्याची माहिती आहे.
अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपामुळे इजमिर शहरातील अनेक इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय २०० हून अधिकजण जखमी असल्याची भीतीही वर्तवण्यात आली आहे. अनेक इमारती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्या या भागात बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. भूकंपानंतरही भयावह स्थिती पाहता या भागात त्सुनामीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
युरोपीय भूमध्यसागर भूकंप संशोधन केद्राने दिलेल्या माहितीनुसार,या भूकंपाचा केंद्र्रबिंदू युनानच्या उत्तर पूर्वला सामोस द्वीप बेटांमध्ये होता. सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहे़ यात नुकसानाची मोठी तीव्रता दिसून येते.