मुंबई

कांदा साठवणूक क्षमता वाढवावी, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

(Last Updated On: October 31, 2020)

केंद्र शासनाने 23 आॅक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तू कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाºयांसाठी 25 मे.टन तर किरकोळ कांदा व्यापाºयांसाठी फक्त 2 मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई : कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकºयांकडून कांदा खरेदीदार कांदा व्यापाºयांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनावरून वाढवून 1500 मे. टन एवढी करण्यात यावी,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांना पाठवले आहे.

केंद्र शासनाने 29 आॅक्टोबर 2020 रोजी च्या सूचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून ग्रेडींग/ पॅकेजिंगसाठी तीन दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खूप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा.
रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या 1/3 उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा नियातर््ाीमध्येही महाराष्ट्राचा हिस्सा ८० टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी मागील हंगामात रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे 100 लाख मे.टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती दिली.
मागील काही वर्षात सप्टेंबर आणि आॅक्टोबर या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. असे असले तरी मागील रब्बी हंगामाच्या साठवलेल्या कांद्याचे ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले आहे. प्रतिकूल हवामानामुळे खरीपाचा नवा कांदा येण्यास उशीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध प्रदेश, मध्य प्रदेश अशा कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीने शेतातील उभ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि आॅक्टोबर 2020 मध्ये कांद्याचे भाव वाढलेले दिसून येत असल्याचे नमूद केले आहे.

खरिपाचा कांदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणे सुरू होणे अपेक्षित आहे. खरिपाचा कांदा अत्यंत नाशवंत स्वरूपाचा असल्याने सध्याच्या साठवणूक क्षमतेच्या निकषामुळे व्यापाºयांकडून हा कांदा खरेदी झाला नाही तर राज्यातील कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान होईल. मागील सहा महिन्यात कोविड-19 च्या लॉकडाऊन काळात कांदा उत्पादकांनी मोठे नुकसान सोसले आहे. ही परिस्थिती पाहता ‘एपीएमसी’मध्ये थेट शेतकºयांकडून कांदा खरेदी करणाºया व्यापाºयांची कांदा साठवणूक क्षमता ही 1500 मे. टन करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.