महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

राजधानी मुंबई

मुंबई : आदिकवी, महाकाव्य रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले आहे. महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून आपल्याला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावरुन चालण्याचा सर्वांनी प्रयत्न करूया, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
श्री रामांच्या जीवनचरित्राप्रमाणेच महर्षी वाल्मिकींच्या जीवनातूनही खूप काही शिकण्यासारखे आहे. मोह, मत्सर, हिंसा, अहंकार, असत्यातून काहीही साध्य होत नाही. महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातून दिलेला विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी महर्षी वाल्मिकींच्या विचारांचे स्मरण करून त्यांना वंदन केले.

राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा
देशाचे पहिले उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री, पोलादी पुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून राज्यातील जनतेला राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

इंदिरा गांधी यांना भावपूर्ण आदरांजली                                                                माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखत देशाला महासत्ता बनण्याच्या वाटेवर आणण्यात स्वर्गीय इंदिराजींचे नेतृत्व, कर्तृत्व, त्याग, बलिदानाचे योगदान सर्वाधिक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली.
पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून देशाच्या विकासाचा पाया भक्कम केला. आशियाई खेळांचं आयोजन असो की, अलिप्त राष्ट्रांचं नेतृत्व करण्याची क्षमता, इंदिराजींच्या अनेक निर्णयांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा गौरव वाढवला. देशाच्या एकता, अखंडता, सार्वभौमत्वासाठी प्राणांचं बलिदान देणाºया महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *