Home राष्ट्रीय राजस्थानात फटाके विक्रीवर संपूर्णत: बंदी

राजस्थानात फटाके विक्रीवर संपूर्णत: बंदी

89

जयपूर : राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारने यंदाच्या दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय घोषित केला आहे. जगभरात चीनने लादलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.( rajsthan government aginst diwali fireworks )
कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच रुग्णांच्या आरोग्यविषयी समस्यांत आणखी वाढ होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, फटाक्यांच्या धुरामुळे कोविड -१९ रुग्णांना हृदय आणि श्वासासंबंधी आणखी अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे फटाक्यांची विक्री आणि परवान्यांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान,फ्रान्स आणि ब्रिटननेही आपल्या देशात पुन्हा एकदा लाकडाऊन घोषित केले आहे.