Home राज-पाट अमेरिकेत अटीतटी, रात्रीपर्यंत मतदान

अमेरिकेत अटीतटी, रात्रीपर्यंत मतदान

92

वॉशिंग्टन : अमेरिकेत यंदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. उद्या मंगळवारी रात्री नऊपर्यंत मतदान करता येणार आहे. ( american poll )
चीनने जगभरात पसरवलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटात जगातील जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लीकन पक्ष) दुसºयांदा राष्ट्राध्यक्षपदाच्या रिंगणात असून त्यांच्यासमोर डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांचे आव्हान आहे.
दरम्यान, या देशाच्या राज्यघटनेनुसार, दर चार वर्षांनंतर नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाºया मंगळवारी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येते. मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत मतदान होईल.