Home उपराजधानी नागपूर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू

79

नागपूर  : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान घेण्यात येत असल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली. महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित                                                                             अमरावती : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित आज घोषित केला. यानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे.
निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया 7 डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली तिचे संबंधितांनी पालन करावे, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केले आहे.
—————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here