Home राजधानी मुंबई वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता

वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता

59

मुंबई : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
डॉ. राऊत यांनी सोमवारी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोविड कालावधीमध्ये अनेकांच्या रोजगारावर विपरित परिणाम झाला. तसेच घरामध्ये रहावे लागल्यामुळे विजेचा वापर वाढल्याने अधिक वीजबिले आली. वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याची मागणी होत असून, त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.