राज-सत्ता

अफगाणिस्तानात भ्याड हल्ला, 22 विद्यार्थी ठार

(Last Updated On: November 3, 2020)

काबूल : काबूल विद्यापीठात इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती स्फोटात 22 विद्यार्थी ठार झाल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील विद्यापीठात सोमवारी इस्लामिक स्टेट (ईसिस) च्या हल्लेखोराने विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करून स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले. यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात 22 जणांचा मृत्यू झाला. काही वर्गात रक्ताचे पाट वाहत होते. अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी आश्रय घेण्यासही उसंत मिळाली नाही, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आठवडाभरात काबूलमधील शैक्षणिक संस्थांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे.