Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र …आणि महाराष्ट्रातील अग्रणी नदी देशात पहिली

…आणि महाराष्ट्रातील अग्रणी नदी देशात पहिली

80

नवी दिल्ली  : सांगली जिल्ह्यातील अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवन कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी जिल्ह्याची निवड झाली आहे. पुढील आठवड्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या ( jal shakti ministry ) वतीने जलक्षेत्रातील उत्कृष्ट कायार्साठी वर्ष 2019 चे ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ घोषित झाले आहेत. विविध 12 श्रेणींमध्ये एकूण 88 पुरस्कार जाहीर झाले आहेत. नदी पुनरुज्जीवन श्रेणीमध्ये देशातील एकूण 6 विभागांमध्ये प्रत्येक विभागातील सर्वोत्तम तीन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याला अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनाच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पश्चिम विभागात चार राज्ये आणि दोन केंद्र्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.                  सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे उगम असलेली अग्रणी नदी ( agranee river ) 150 वर्षांपूर्वी वाहती होती. मध्यंतरीच्या काही दशकात ही नदी कोरडी होती. शिवाय तिचे काही क्षेत्र लुप्त झाले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीसाठे निर्माण करण्याच्या कार्यांतर्गत अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेतले. जिल्हा प्रशासनाने खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील 55 कि.मी. लांबीची अग्रणी नदी बारमाही करण्याच्या ध्यासाने कार्य केले.
राज्य शासनाची योजना, जलबिरादरीसह सिंचन क्षेत्रात कार्यरत सेवाभावी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने वर्षानुवर्षे कोरड्या पडलेल्या नदीला संजिवनी मिळाली. नदीच्या उगमापासून खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here