Home राष्ट्रीय बिहार विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यात ५१.८ टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यात ५१.८ टक्के मतदान

85

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५१.८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
आजच्या दुसºया टप्प्यात ९४ जागांसाठी १ हजार ४६३ उमेदवार रिंगणात आहते. यात भाजपाचे ४६, संयुक्त जनता दलाचे ४३ आणि विकासशील इन्सान पार्टीच्या ५ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय जनता दलाचे ५६ काँग्रेस २४, लोक जनशक्ती पार्टी ५२, राष्ट्रीय लोक समता पार्टी ३६, बहुजन समाज पार्टी ३३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ उमेदवार रिंगणात आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव राघोपूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत आहे. राज्य सरकारमधील चार मंत्रीही आपले भवितव्य आजमावत आहे.
आकाशवाणीवृत्तानुसार, २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २८ आॅक्टोबरला मतदान पार पडले. तिसºया आणि शेवटच्या टप्प्यासाठी येत्या ७ तारखेला मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबरला होईल. (सांकेतिक छायाचित्र)