मुंबई राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय

महाराष्ट्रासह १५ राज्यांना २ हजार २०० कोटी वितरित

(Last Updated On: November 3, 2020)

नवी दिल्ली : दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासह १५ राज्यांना पहिल्या टप्प्यात २ हजार २०० कोटी रुपये वितरित केले आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून हा निधी जारी केला आहे.
दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढवणे तसेच वायू गुणवत्ता ( air quality ) सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याकरता या निधीचा उपयोग होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, तामिळनाडू, उत्तर प्रदेश कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्राला एकूण निधीपैकी ३९६ कोटी रुपये दिले आहेत. आकाशवाणीने यासंबंधी वृत्त दिले आहे. (सांकेतिक छायाचित्र)