देश

अभिनेता फराज खान बंगळुरूमध्ये निधन

(Last Updated On: November 4, 2020)

बंगळुरू : चित्रपट अभिनेता फराज खान याचे आज बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले़ वयाच्या ४६ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री पूजा भट्टने निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली. माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून फराज बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात मेंदूच्या कर्करोगावरील उपचार घेत होता. मात्र, त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करण्याची विनंती देशवासीयांना केली होती. त्यानंतर सलमान खानने २५ लाख रुपयांची मदत केल्याचे सांगण्यात येते. फराजने १९९६ साली ‘फरेब’ चित्रपटातून आपली कारकीर्द सुरू केली होती.

काही चित्रपट
पृथ्वी
दुल्हन बनू में तेरी
चाँद बुझ गया
मेहंदी
मालिका
वन प्लस वन
शू ऽऽऽ कोई है
रात होने को है
करिना करिना