Home राजधानी मुंबई पत्रकार अर्णब गोस्वामी यांना घरातून अटक

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना घरातून अटक

84

मुंबई : रायगड पोलिसांनी एका व्यावसायिकाच्या आत्महत्याप्रकरणात रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी राहत्या घरातून अटक केली. त्यांना अलिबागकडे नेण्यात येत असल्याचे समजते.
माहितीनुसार, ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक आणि आई कुमुद नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या एका पत्रात अर्णब गोस्वामी आणि अन्य दोन इसमांनी नाईक यांचे ५.४० कोटी रुपये थकवल्याचा आरोप करत त्यांनी गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते.
पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रे, न्यायालयीन आदेश वा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आल्याचे विविध प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्यावर टीआरपी घोटाळ्याचेही आरोप असल्याचे सांगण्यात येते.