Home राजधानी मुंबई संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्ताव

संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबतचा प्रस्ताव

61

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करावा, असे निर्देश फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले.
आज मंत्रालयात राज्यमंत्री कु.तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
पिक असलेले संत्रा पिकावर अवलंबून असणाºया उत्पादक शेतकºयांचे जीवनमान उंचावणे व आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी एकीकृत संत्रा उत्पादनवाढ, तंत्रज्ञान प्रक्रिया व पणन असा प्रकल्प या भागात व्हावा, असा विचार आहे़ त्यामुळे हा प्रकल्प उभारणीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे कुमारी तटकरे यांनी सांगितले. यावेळी आमदार देवेद्र भुयार, कृषी आयुक्तालयाचे संचालक (फलोत्पादन) डॉ. के.पी. मोते, संचालक एन.टी. शिसोदे, कृषी व पदुम विभागाचे सह सचिव (फलोत्पादन) अशोक आत्राम, उद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अनिलकुमार उगले, विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग सुभाष नागरे, पणन विभागाचे कक्ष अधिकारी जयंत भोईर तसेच नियोजित प्रकल्पशी संबंधित शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.
हे आहेत प्रकल्प
संत्रा ज्युस कॉन्सर्टेड
संत्रा ज्युस पावडर
इथेंसियल आॅईल
अरोमा आॅईल
कॅटल फीट प्रकल्प
संत्रा ग्रेडींग-व्हॅक्सिंग प्रकल्प
कोल्ड चेन व स्टोरेज
रिफेन व्हॅन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here