Home राज-पाट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात

88

United State Elections Result : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयापासून काही जागांनी दूर असतानाच निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात पोहोचले असल्याची माहिती आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत़ विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प माघारले आहेत. त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. या देशात सर्वाेच्च पदाच्या विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे.