Home ब्लॉग नवरात्रात 51 भगिनींसाठी ‘दीपस्तंभ’चा नवा ‘दीप’

नवरात्रात 51 भगिनींसाठी ‘दीपस्तंभ’चा नवा ‘दीप’

89

 

नवरात्रोत्सव हा नवा रंग, नवी आशा, नवा भाव निर्माण करणारा उत्सव़़़मुळात देवीची आराधना करणारा हा सोहळा़ यंदाच्या कोरोना संकटामुळे तो साजरा करण्यावर काहीसे बंधन आले असले तरी नागपुरातील ‘दीपस्तंभ धर्मदायी संस्थे’ने तो आगळ्या स्वरुपात साजरा केला. निश्चितच तो अनेकांना कायम स्मरणात राहणारा आहे.

प्रमुख पाहुणे दीपक देशपांडे आणि अन्य (कामगार कॉलनी)
प्रमुख पाहुणे दीपक देशपांडे आणि अन्य (कामगार कॉलनी)

या नवरात्र उत्सवात एकूण तब्बल ५१ भगिनींचा साडीचोळी, धान्य, ताट-वाटी, ग्लास, मास्क, सॅनिटायझर, फळ, औषधी व इतर आवश्यक वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमाने सर्व भगिनींच्या चेहºयावर फुललेले हास्य आणि समाधान कल्पनातित होते. या ५१ ‘दुर्गां’चा सन्मान केल्याबद्दल नागरिकांनी कौतुक होत आहे, ही हर्ष वेगळाच. हा कार्यक्रम तब्बल नऊ दिवस नागपूर शहर, हिंगणा, इससानी, कळमेश्वर याठिकाणी राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता तुकडोजी नगर येथे २१ जित्या जागत्या देवींना साडीचोळी देऊन करण्यात आला. यावेळी शरदचंद्र नार्लावार, दीपक देशपांडे, अरुण हरदास, रघुजी चेपूरवार आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे रजनी डोहारे, सुहासिनी डियेवर आणि अन्य मान्यवर (काचीपुरा, रामदासपेठ)
प्रमुख पाहुणे रजनी डोहारे, सुहासिनी डियेवर आणि अन्य मान्यवर (काचीपुरा, रामदासपेठ)

नवा ध्यास
संस्थेने ‘माझ्या ताईला साडी’ या उपक्रमाअंतर्गत विधवा, गोरगरीब, निराधार, गरजवंत जित्या जागत्या देवींना साडी देऊया, देवींच्या चेहºयावर हास्य फुलवूया हा कार्यक्रम हाती घेतला, तो मुळातच त्यागाच्या भावनेतून. एक स्त्री, एक महिला ही त्यागातूनच उदयास आलेली असते़ तिचं आयुष्यही त्यागमय असते, हे कुणी नाकारू शकणार नाही. ‘दीपस्तंभ’ नेही नवरात्रात देवींची खरी उपासना केली, असे म्हणता येईल.

प्रमुख पाहुण्या डॉ़रजनी चिमुरकर, वीणा खानोरकर यांच्यासह अन्य मान्यवर (सुभाष नगर)

नागपूर शहराला लागून असलेल्या इसासनी, तालुका हिंगणा, जि. नागपूर ( प्रणव मते ), बंडू सोनी ले-आऊट ( प्रमुख पाहुणे मेघा शंतनू पांडे), लोखंडेनगर याठिकाणी राजेंद्र चौरागडे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. तुकडोजीनगर झोपडपट्टी (प्रमुख पाहुणे उपेंद्र हिरवडकर) या भागात अगदी भक्तीभावाने हा कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमाविषयी ‘दीपस्तंभ’चे अध्यक्ष राजेंद्र चौरागडे यांनी सांगितले, की नवरात्रात आपण देवीची ओटी भरतो त्याची देवीला आवश्यकता आहे का? अनेक ठिकाणी तीच साडी दुसºयांना विकत असल्याचे आपण पाहतो. शिवाय इकडे तिकडे पडली राहते. हे पाहून देवी आनंदी होईल का? भगवंताने आम्हाला येथे गोरगरिबांची व दुखितांची सेवा करण्यासाठी जन्मास घातले आहे. आजही अनेक आमच्या ताईंना वषानुवर्षे नवीन साडी मिळत नाही. आमच्या विधवा ताईंना अशा शुभकार्यात दूर ठेवल्या जाते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही देवीला जे अपेक्षित आहे अशा गोरगरीब व वंचित स्त्रियांना देवीचे रूप मानून ५१ ताईंना साडीचोळी,धान्य, औषधी, सॅनिटाईझर प्रदान करून त्यांच्या चेहºयांवर हास्य फुलवण्याचे ठरवले.

संपूर्ण आयोजनासाठी अध्यक्ष राजेंद्र चौरागडे, सचिव नंदू मानकर, विनोद महाजन, राजेंद्र केवटे, प्रणव मते, चेतन नारखेडे, प्रभात झा, प्रज्वल गोडे, आनंद बोरकर, कैलास येसने, राहुल बोरकर, वर्षा मानकर, भारती चौरागडे, संगीता महाजन, लक्ष्मी विजयवार, संगीता पानसे नेहा उईके, वैशाली नेवारे, विजया आगलावे, प्रवीण बावनकुळे, आनंद राठी आदींनी सहकार्य केले़ त्यामुळे उपक्रमाच्या मोठ्या यशस्वीतेत महत्त्वाचा वाटा आहे.
आणि निश्चितच पुढील अनेक वर्षात हा सोहळा पडेल, यात शंका नाही.

शिल्पा वकलकर
नागपूर