फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी : आरोग्यमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार असून ‘फिव्हर सर्वेलन्स’ प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व ‘डेथ आॅडिट’ कमिटीची बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसºया लाटेचा मुकाबला करण्यासाठीच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ आॅडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण कक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते. आगामी दिवाळी लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करावा. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी गरजेचे आहे. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.
राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यूदर अधिक आहे, त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच ‘डेथ आॅडिटी कमिटी’ नेमून शासनाला अहवाल देण्याचे तज्ज्ञांनी संगितले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही़ मात्र संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० प्रयोगशाळांच्या (लॅब) माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे मंत्री टोपे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *