Home राजधानी मुंबई तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणार

तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करणार

84

मुंबई : थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण (फिव्हर सर्व्हेलन्स) करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, लहान-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी, ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत. लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाºयांना सिम्युलेशन लॅबच्या सहाय्याने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले. राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे ती कायम ठेऊन त्यात अजून वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. ‘टास्क फोर्स’ने जी आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे त्यानुसार उपचार करण्याचे आवाहन श्री. टोपे यांनी केले.