मुंबई

मास्क नाही, प्रवेश नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Last Updated On: November 6, 2020)

मुंबई : नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister) यांनी केले.
मराठी रंगभूमीदिनानिमित्त त्यांनी नाट्यनिर्माते, कलाकार यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. तसेच, त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय सहभागी झाले होते.
कोरोनानंतरच्या काळात निर्मात्यांचे नुकसान झाले आहे़ त्यांच्या विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या मागणीवर शासन नक्की विचार करेल. ह्यमराठी पाऊल पडते पुढेह्ण असे आपण म्हणतो; पण आता पुढील काळात ते अत्यंत खबरदारीने टाकणे गरजेचे आहे, अशी सूचना करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लंडन आणि युरोपमध्ये कोरोनाचे संकट परत वाढल्याची जाणीव करून दिली.
चित्रपट आणि रंगभूमी यात फरक हा आहे की इथे ह्यरिटेकह्ण नाही. त्यामुळे अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. प्रत्येक निर्मात्याने कलाकारांची तपासणी करावी, अभिनयादरम्यान कलाकारांनी अंतर ठेवावे, स्वच्छता ठेवावी. थिएटरमध्ये सुद्धा ह्यनो मास्क नो एन्ट्रीह्ण असे असले पाहिजे. नाट्यगृहाबाहेरील खाण्याचे स्टॉल्स देखील नियम पाळतात की नाही हे पाहिले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बºयाच कालावधीनंतर नाट्यगृहे उघडतो आहोत. अनेक लहान मोठ्या समस्या येतील. आपण सर्वांनी सोबत राहून यातून मार्ग काढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
यावेळी आदेश बांदेकर, सुबोध भावे, मंजिरी भावे, अमेय खोपकर, प्रदीप कबरे, बिभिषण चवरे, डॉ.गणेश चंदनशिवे, प्रदीप वैद्य, प्रसाद कांबळी, यांनी चर्चेत सहभाग घेतला.