Home उपराजधानी नागपूर लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क

लॉकडाऊनमध्ये महिलांनी तयार केले साडेचार हजार खादी मास्क

78

नागपूर : लॉकडाऊन काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत ताजबाग परिसरातील महिलांनी तयार केलेल्या चार हजार 360 खादीचे मास्क कोविड अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाºयांसाठी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना लेबर एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्कच्या श्रीमती किरण ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी लेबर एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्कच्या उपक्रमाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी स्वागत केले.
‘लॉकडाऊन’ काळात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या खादीच्या मास्कची निर्मिती केली. सदर महिलांना लेबर एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क लर्नच्या माध्यमातून खादीचे मास्क तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले होते. एचसीएल फाऊंडेशनच्या वतीने उपक्रमाला आर्थिक मदत देण्यात आली होती. या काळात ज्या महिला रोजगारापासून वंचित झाल्या होत्या त्यामध्ये मोठा ताजबाग परिसरातील महिलांचा समोवश आहे. यात श्रीमती शमीन बी. शहनशाह, नसिमा बानो, समीना परवीन, समीना शेख, खुशबू खातून, रुबिना परवीन, रोजीन हरकतऊल्ला, फुलसाना परवीन, नसीम शेख, शहजादी शेख वहिद निलोफर नाज, शमसुनिशा शेख आदींचा समावेश आहे.

संज्या : आज आपण बाहेर जेवू गं… Tapori Turaki

दरम्यान, खादी मास्क तयार करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रोत्साहन दिले होते. या उपक्रमामुळे महिलांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती वर्कर वेलफेअर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे जम्मू आनंद यांनी दिली.