Home उपराजधानी नागपूर १२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर

१२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर

84

नागपूर : विधान परिषदेसाठी महाविकासआघाडी सरकारतर्फे राज्यपालांकडे सोपवलेल्या १२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातून ते एकमेव आहेत. त्यांनी मागील वर्षी वंचित आघाडीकडून निवडणूक लढवलेली होती.महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील नावांची यादी बंद लिफाफ्यात शुक्रवारी सादर केली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री नवाब मलिक आणि मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारने दोन आठवड्यांपूर्वी १२ जागांवरील नावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. यावेळी तिन्ही पक्षांकडून 12 जणांची नावे अंतिम केली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे (साहित्य) आणि आनंद शिंदे (कला). काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर (कला), शिवसेनाकडून उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.
यासंदर्भात अनिल परब यांनी सांगितले, की १२ जागांच्या नावाची यादी मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह बंद लिफाफ्यात राज्यपालांना दिली आहे. यासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर राज्यपाल ही नावे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.