भिक्षेकºयांची माहिती देऊ इच्छिणाºयांनी संपर्क साधावा

राजधानी मुंबई

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास कायदेशीर पद्धतीचा अवलंब करून संबंधितास भिक्षेकरी स्वीकार केंद्रात दाखल करून घेण्यात येते. याबाबत माहिती देऊ इच्छिणाºयांनी संबंधित भिक्षेकºयाचे भीक मागतानाच्या छायाचित्रासह तारीख, शहर आदी माहिती mahabhishodhpune@gmail.com  या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्तांनी केले आहे.
महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 नुसार सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे हा गुन्हा आहे. अशाप्रकारे भीक मागताना आढळून आलेल्या व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र असून अशा व्यक्तींना न्यायालयाच्या आदेशाने भिक्षेकरी स्वीकार केंद्र्रात दाखल करण्यात येते. भिक्षेकºयांसाठी राज्यात महिला व बालविकास विभागांतर्गत पुरुष व महिलांसाठी एकूण आठ भिक्षेकरी स्वीकार केंद्र्रे कार्यरत आहेत. आपल्या शहरात, गावात सार्वजनिक ठिकाणी भीक मागणारी व्यक्ती आढळून आल्यास पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सदर व्यक्तीच्या भीक मागतानाचे फोटोसह, ठिकाण, शहर याबाबतची माहिती  mahabhishodhpune@gmail.com  या ईमेलवर पाठवण्यात यावी, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *